Fun&learn वर आपले स्वागत आहे.      Numbers - वचन


वचनाचे दोन प्रकार आहेत.

1) Singular - एकवचन

2) Plural - अनेकवचन

                             जसे मराठीमध्ये वचनाचे दोन प्रकार आहेत. तसेच इंग्रजी मध्ये सुद्धा वचनाचे दोन प्रकार आहेत . पहिला आहे Singular म्हणजे एकवचन आणि दुसरा आहे Plural म्हणजे अनेकवचन. मराठीमध्ये एक वचनाचे आणि प्रचंड करण्याची पद्धत आपल्याला माहीतच आहे.

उदा. 









                     ज्या पद्धतीने आपण मराठीत एकवचनाचे अनेकवचन करतो. तसेच इंग्रजीमध्ये सुद्धा Singular चे Plural  म्हणजे एकवचनाचे अनेकवचन करावे लागते. परंतु इंग्रजीमध्ये एकवचनाचे अनेकवचन करताना काही नियमांचा अभ्यास करावा लागतो. तर नियमांचा वापर करून एकवचना चे अनेकवचन कसे करतात हे आपण बघणार आहोत खालील काही नियमांच्या आधारे आपण एकवचनाचे अनेकवचन म्हणजे  Singular चे Plural कसे करतात ते अभ्यासू.

1) सामान्यपणे एकवचनाचे अनेकवचन करतांना नामा पुढे ‘ S ’ लिहीतात.

उदा. 

book - books  

Tree - Trees 

Cat - Cats 

Dog - Dogs  

Window - Windows 

House - Houses 

Mat - Mats 

Doctor - Doctors

Teacher -  Teachers

Fan  - Fans 

Chair - Chair 

Table - Tables

2) जर सामान्यनामाचा शेवट S,Sh,Ch,X किंवा O ने होत असेल तर अनेकवचन करतांना नामा पुढे ‘ es ’ लिहीतात.

उदा. 

Class - Classes

Bus - Buses

Match - Matches

Watch - Watches

Box - Boxes

Fox - Foxes

Mango - Mangoes

Tomato -  Tomatoes

3) जर सामान्यनामाचा शेवट ‘ Y ’ ने होत असेल व त्यामागील अक्षर व्यंजन (consonant) असेल तर अनेकवचन करतांना Y काढुन ‘ ies ’ लिहीतात.

उदा.

Story - Stories

Baby - Babies

City - Cities

Lady - Ladies

Country - Countries

Body - Bodies

4) जर सामान्यनामाचा शेवट ‘ Y ’ ने होत असेल व त्यामागील अक्षर स्वर (vowels) असेल तर अनेकवचन करतांना सरळ ‘ s ’ लिहीतात.

उदा.

Toy - Toys

Boy - Boys

Day - Days

Key - Keys

Monkey - Monkeys

5)जर सामान्यनामाचा शेवट ‘ F ’ किंवा ‘ Fe ’ ने होत असेल तर अनेकवचन करतांना त्याऐवजी ‘ Ves ’ लिहीतात.

उदा.

Thief -Thieves

Knife - Knives

Wolf - Wolves

Leaf - Leaves

Calf - Calves

Wife - Wives

Live  - Lives

6)काही सामान्यनामांची अनेकवचनी  रूपे नियमानुसार होत नाही.

उदा.

Man - Men

Child - Children

Woman - Women

Ox - Oxen

Tooth - Teeth

Mouse - Mice

Foot - Feet

                    या सर्व नियमांचा तुम्ही अभ्यास  केला तर तुम्हाला इंग्रजीमध्ये Singular चे Plural करणे अगदी सोपे होईल .

◆  तुम्हाला जर Numbers - वचन Singular चे Plural करणे यावर आधारित व्हिडिओ बघायचा असल्यास खालील व्हिडिओ वर क्लिक करा.


Thanks for reading my blog Numbers.

Post a Comment

Previous Post Next Post